स्थानिकांना जीवनावश्यक वस्तू देताना बिरजू मांढरे व इतर
बारामती:
बुधवार दिनांक 14/10/2020 रोजी परतीचा पाऊसामुळे, वादळीवारे दिवसभरात झालेल्या पाऊसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे जळोची येथे पुनर्वसन केलेल्या पत्राशेड मध्ये शेजारील ओढ्याचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली या अतिवृष्टीचा आढावा घेत नगरसेवक बिरजू मांढरे तत्काळ त्या ठिकाणी पोहचले व जेसीबीद्वारे ओढ्यातील वाहणाऱ्या पाण्याला मोकळी जागा करण्यास सुरुवात झाली पण वेगाने सुरू असलेल्या पाऊसामुळे ओढ्याच्या पाण्याची पातळी वाढत राहिली आणि हळू हळूहळू पाणी पत्राशेडकडे वळण्यास सुरुवात झाली, बारामतीत सर्वत्र मोबाईल नेटवर्क ला प्रॉब्लम झाल्याने नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांना संपर्क होईना पाण्याची पातळी वाढत चालल्याने बिरजू भैया यांनी प्रत्येक घरात जाऊन सतर्क राहण्याचे निर्देश दिले, अगदी काही वेळातच ओढया बरोबरच सम्पूर्ण पत्राशेडमध्ये ही पाण्याची पातळी वाढत असल्याचे निदर्शनास येतात नगरसेवक बिरजूभैया मांढरे, जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर, नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे यांनी मनुष्यहानी होऊ नये म्हणून पत्राशेड मधील प्रत्येक नागरिकांना घराबाहेर काढले व सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करून त्यांना झोपण्यासाठी गाद्या चादरी उपलब्द करून दिल्या व रात्री 12 वाजता किरणदादा गुजर यांनी नागरिकांना जेवन उपलब्ध करुन दिले, रात्री पाऊस कमी झाला आणि गुरुवार दिनांक 15/10/2020 सकाळी पर्यंत पाण्याची पातळी कमी झाली या अतिवृष्टीमुळे स्थानिक लोकांच्या घरातील अत्यावश्यक वस्तू पाण्यात भिजून गेल्या या पार्श्वभूमीवर मा. उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू भैया मांढरे यांनी सदरील ठिकाणची पाहणी करत त्या ठिकाणी झालेल्या नुकसानाचा प्रशासनाद्वारे पंचनामा करून घेतला तसेल कीटकनाशक फवारणी व संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करून घेतला तसेच जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख साहेब , प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटिल नगरसेवक किरण गुजर यांनी अतिवृष्टीचा आढावा घेतला व किरणदादा गुजर यांनी नागरिकांची जेवण, चहा, नाष्टाची सोय उपलब्ध करून दिली या मधे माजी नगरसेवक अभिजीत चव्हाण व विद्यमान नगरसेवक अभिजीत जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शनिवार दिनांक 17/10/2020 रोजी मा. उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू भैया मांढरे यांच्या स्वखर्चातुन नगराध्यक्षा सौ. पौर्णिमाताई तावरे यांच्या उपस्थितीत व जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांच्या हस्ते अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या 140 कुटुंबाना पांघरण्यासाठी उबदार रघ, चादर, महिलांना साड्या, 5 किलो घऊ, 5 किलो तांदूळ, 1 किलो तेल, मिठ, वांगी,टोमॅटो, बटाटे,भेंडी,काकडी,भोपळा,मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, मेथी इत्यादी फळ भाज्या आणि पाले भाज्यांचे वाटप केले या वेळी नगरसेवक अभिजीत जाधव व मा. नगरसेवक अभिजीत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते धनंजय तेलंगे, अंकुश मांढरे उपस्थित होते.