अहिल्यानगर (बारामती ) : जय तुळजा भवानी तरुण मंडळ अहिल्यानगर [बारामती] येथे गेली सात वर्ष भव्य दिव्य स्वरुपात व्याख्यानमाला,सांस्कृतिक कला गुणांना वाव,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा,गुणीजनांचे कौतुक,महाप्रसाद आदि कार्यक्रमाची रेलचेल असते.परंतु कोविड व अतिवृष्टी मुळे मंडळाने या वर्षी साधेपणाने देवीचा जागर शासन नियमावलीचे पालन करुन करण्यात येणार आहे.
या वर्षी आईचा जागर ग्रंथ व दर्जेदार साहित्य कृतीच्या माध्यांतून राबविण्यात येणार आहे.साध्या विद्यार्थी अॉनलाईन शिक्षण घेत असून वाचन संस्कृती मागे पडली आहे.त्यासाठी वाचन संस्कृती चळवळ वाढीस लावण्यासाठी मंडळाने हा उपक्रम राबिवला आहे.पुस्तक वाचून आपल्या ज्ञानात भर टाकण्याच कार्य सुरु करण्यात येत आहे.तसेच कोविड बाबतची जनजागृती,सामाजिक अंतर,पौष्टिक आहार या बाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.सर्व पंचक्रोशीतील मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे व उपाध्यक्ष नंदकुमार जाधव यांनी केले आहे.