सातारा दि.15 (जिमाका) : कु. रेणुका पिंटु ससाणे वय वर्षे अंदाजे ८ वर्षे व चि.कृष्णा पिंटू ससाणे वय वर्षे अंदाजे ३ हया बलिका कराड पुलाखाली राहत होत्या यांची आई 1 जून रोजी मयत झाल्याने व वडीलांचा शोध लागत नसल्याने कराड पोलीसा मार्फत
3 जून रोजी बालकल्याण समितीच्या आदेशाने द्रोणागिरी शिक्षण संस्था संचलित शिशुगृह म्हसवड, ता. माण, जि. सातारा या संस्थेत पुढील पुनर्वसन व संगोपनासाठी दाखल केले आहे.
या बालकांच्या वडिलांचा व नातेवाकांचा शोध घेण सुरू असून तशी माहिती असल्यास बाल कल्याण समिती निरिक्षणगृह, सातारा अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा फोन.नं. ०२१६२-२३७३५३ संपर्क साधावा अन्यथा या बालकांचे शासकीय नियमानुसार कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल याची नोंद घ्यावी, असे माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, डी. वाय.ढेपे यांनी कळविले आहे.