सुप्रभात…….आज १५ अॉक्टोंबर जागतिक वाचन प्रेरणा दिन अधिक मासात अधिकाधिक वाचन व जागतिक अंध सहाय्यता दिन

       काही माणसं स्वतः साठी जगत नसून समाज्यासाठी प्रत्येक श्वास देऊन आपले कार्य करीत असतात.त्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागे फार मोठा जीवनाचा अर्थ दडलेला असतो.त्यातून जनसामान्यांची जडणघडण होत असते.
         भारतरत्न शास्त्रज्ञ डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचे व्यक्तीमत्व भारावून टाकणारे होते.सतत नाविन्याचा ध्यास,संशोधक वृत्ती , वाचनाचा व्यासंग,विचारप्रवण मौलिक भाषणे,दर्जेदार साहित्य निर्मिती यातूनच युवापिढीला त्यांची भूरळ पडायची.
       भारत सरकारने त्यांचा जन्मदिन वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचे जाहिर केले.वाचन प्रेरणा दिन अर्थात एकदिवसापुरते न वाचता अखंड वाचन हाच खरा उद्देश होय.वाचन ही भूकेपेक्षा खूप मोठी मानसिक भूक आहे.शरीराची भूक अन्न पाणी यांने भागते पण मनाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन हवेच.
          “दिसा माजी काही तरी लिहित वाचीत जावे”या उक्तीप्रमाणे आपण लहानपणा पासून बालकाच्या शारीरिक वाढीबरोबरच वाचन सवय अंगीकारली पाहिजे .त्यासाठी प्रत्येक कुटुंबात देवघरा बरोबरच ग्रंथघर असावे. मनोभावे दररोज वाचन करावे.आवडीचे सवडीने वाचावे.वर्तमान पत्र प्रत्येक घरात हवेच.वाचन कसे केव्हा कधी करावे याचा संस्कार बालवयातच रुजवावा.
           देवघरात तिन्हेसांजेला समई प्रज्वलीत केली की शुभंकरोती,रामरक्षा,अर्थवशीर्ष, ज्ञानेश्वरी ,गाथा,दासबोध,ग्रामगीता इत्यादी ग्रंथाबरोबरच साने गुरुजींचे श्यामची आई याचे पारायणे करावीत.मात्र सातत्याने तिन्हे सांजेला तासभर वाचन नित्यनेमाने.
                  घरात वर्तमान पत्र,साप्ताहिके,पाक्षिक,मासिक,विशेषांक,दर्जेदार दिवाळी अंक याचबरोबर कथा,कादंबरी ,कविता,ललित,प्रवासवर्णने,वैचारिक,सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,आर्थिक ,धार्मिक ,राजकीय ,विनोदी,हलके फुलके,रहस्य वाड्मय आपल्या परीने संग्रही असावे.
             वाचनाने माणूस संयमी,शांत,विचारशील ,प्रग्लभ बनतो.झपाटल्यासारखे वाचले पाहिजे.त्यातून संबंधित वाड्मय प्रकारातील लेखकांना बरोबर भ्रमणध्वनी ,पत्रव्यहार,प्रत्यक्ष भेटीतून संवाद साधल्यास नवनविन कलाकृती निर्माण होतील.आपणाला त्याचा निश्चितच लाभ होईल.
       *डोळे असून अंध भूमिका  निभावणा-या जनमाणसांने सावध रहावे.आपण आपल्या परीने सर्वच क्षेत्रात दिशा व दशाहीन झालेल्यांना योग्य मार्ग दाखविणे*

*आपलाच वाचक प्रा.रवींद्र कोकरे वाचाल तरच वाचाल ओम नमो नमो*
*ता.क.परतीच्या अतिवृष्टीने बळीराजाचे आतोनात नुकसान झाले.तो सावरणारच शासनाने व सामाजिक दानशूर संस्थानी तातडीची भरपाई करावी*

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!