बारामती: बारामती नगरपरिषद हद्दीतील बारामती हॉस्पिटल शेजारी असलेल्या शेंडे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याचे अद्याप रस्त्याचे काम न केल्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचते त्याच प्रमाणे चिखल होत असल्याने रस्त्याने चालणे सुद्धा कठीण होत असते व दुचाकी नेहण्यासाठी सुद्धा ढकलत न्यावी लागते तर चारचाकी या ठिकाणाहून नेहने शक्य नाही. चालत असताना पाय घसरून पडण्याच्या घटना घडल्या मुळें नागरिकांना दुखापत सुद्धा झाली आहे.
नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषद प्रशासन कडे तक्रार केली आहे परंतु आश्वासन शिवाय उत्तर मिळत नाही.शेंडे वस्ती हा बाग नगरपरिषद ह्या हद्दीत येतो या ठिकाणी रस्ता केला जात नाही या बदल स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहे.
नगरपरिषद प्रशासन ने येत्या दोन महिन्यात रस्ता न केल्यास स्थानिक नागरिक आंदोलन करणार आहेत.