लॉक डाऊन नंतर गावात एसटी आल्यावर एका महिला प्रवाशाने हात जोडून वंदन केले (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती अनिल सावळेपाटील :
लॉकडाऊन नंतर एसटी च्या फेऱ्या राज्यातील ग्रामीण भागात नियमित सुरू होतील अशी अपेक्षा होती व एसटी कर्मचारी यांचा पगार दर महिन्याला वेळेकर होऊल अशी अपेक्षा होती मात्र अजूनही दोन्ही नियमित नसल्याने एसटी कर्मचारी व प्रवाशी या दोघांना चिंता सतावत आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन नंतर एसटी ने उत्पन्न वाढी साठी मालवाहतूक करणे,बेस्ट ला बसेस भाड्याने देणे,पर राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र मध्ये आणणे आदी उपक्रम राबवत आहे परंतु दिवसाला 5 किंवा 6 कोटी महसूल येत आहे त्या मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार भागणे अशक्य आहे कारण एक लाख पाच हजार कर्मचाऱ्याना महिन्याला 220 कोटी रुपये पगार अपेक्षित आहे . शासनाने पगार देण्यासाठी दोन वेळा मदत केली परंतु उत्पन्न नाही व दर महिन्याला शासनाने पगार करणे आता शासनालाच परवडणार नाही त्यामुळे या मध्ये तोडगा निघणे गरजेचे आहे ऑगस्ट व सप्टेंबर चा पगार येणे बाकी आहे तर दिवाळीचा बोनस गेल्या अनेक वर्षा पासून बंद आहे त्यामुळे तो मिळणार नाही परंतु दिवाळीच्या सणा साठी राहिलेला सर्व पगार मिळावा अशी मागणी सर्व कामगार संघटना करत आहे .
दुसरीकडे एसटी च्या लांब पल्याच्या फेऱ्या सुरू झाल्या परंतु त्यास फारसा प्रतिसाद नाही तर ग्रामीण भागातील फेऱ्या अद्याप मोठ्या क्षमतेने सुरू नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी आतुरतेने एसटी ची वाट पहात आहे ग्रामीण भागात एसटी फेऱ्या सुरू केल्यास अपेशक्षित प्रवाशी संख्या मिळत नसल्याने महसूल मिळत नाही अशी अवस्था एसटी ची आहे. पहिल्या सारखी ग्रामीण भागातील सेवा सुरू करण्यासाठी आणखीन काही काळ थांबवा लागेल असे मत एसटी मधील अधिकारी सांगत आहेत.रिक्षा,जीप आदी वाहने जास्त पैसे आकारतात त्यामुळे ते परवडत नाही एसटी चे भाडे परवडते व वेळेत एसटी असते त्यामुळे कामे लवकर होतात असे ग्रामीण भागातील प्रवासी सांगतात.
एसटी म्हणजे महाराष्ट्र राज्याची जीवन वाहिनी म्हणून पाहिले जाते या मध्ये कर्मचारी जगला पाहिजे तर एसटी ला प्रवासी मिळाले पाहिजेत तरच ही जीवन वाहिनी सुरळीत पणे चालेल व दोघांनाही फायदा होणार आहे .राज्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी बसेस फेऱ्या सद्या 2 किंवा 3 होतात पूर्वी याच मार्गावर 12 फेऱ्या होत होत्या. ग्रामीण भागातील जनता आतुरतेने वाट पहात आहे तर अपेक्षित प्रवासी मिळत नाही ही दुसरी बाजू आहे. कर्मचारी व प्रवासी या दोघा साठी शासनाने लवकर भूमिका जाहीर करावी अशी मागणी आता पुढे येत आहे.
चौकट:
एसटी ने वैभव असताना शासनाला संकट समयी वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे व विविध प्रकारच्या सवलती दिल्या आहेत आता
एसटी कर्मचारी यांचा अंत शासन पहात आहे एक तर पगार वेळेच्या वेळी करा किंवा शासन सेवेत सामावून घ्या म्हणजे प्रश्न सुटेल अन्यथा कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटूंबियाचा संयम तुटेल अशी माहिती बारामती विभागीय कार्यशाळा एसटी कामगार संघटना अध्यक्ष मनोज जगताप व सचिव राजेंद्र भोसले यांनी दिली.
चौकट:
कितीही आलिशान वोल्वो किंवा वातानुकूल बसेस येऊ द्या परंतु चे एसटी ग्रामीण जनतेशी आपुलकीचे नाते आहे बऱ्याच महिन्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलणी केल्यावर काही ग्रामीण भागात एसटी सुरू झाली आहे त्यामुळे ग्रामीण प्रवासी आनंदी असल्याचे प्रवासी महासंघ चे कार्याध्यक्ष महेश सातपुते यांनी सांगितले.
Post Views: 51