बारामती: जामदार रस्त्यावरील वाहून गेलेला पूल नगरपरिषद प्रशासन दुरुस्त करत नाही किंवा बांधून देत नसल्या मुळे स्थानिक नागरिकांनी लोक वर्गणी गोळा करत पाईपलाईन टाकत पुलाची दुरुस्ती केली व शेजारील जागेत वृषारोपन केले आहे व नगरपरिषद प्रशासन चा निषेध केला आहे.
जामदार रस्ता ते मोरगाव टोल नाका कडे जाणाऱ्या ओढ्यावर मागील वर्षी प्रशासन च्या वतीने सिमेंट चा पाईप टाकून तात्पुरती डागडुजी करून नागरिकांची येण्या जाण्याची तात्पुरती सोय केली होती परंतु गेल्या चार पाच दिवसात झालेल्या पावसाच्या पाण्याने सदर सिमेंट पाईप व तात्पुरचा केलेला सिमेंट चा गिलावा वाहून केला त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून त्या ठिकाणी प्रशासन ने पक्का व कायमस्वरूपी पूल बांधून द्यावा अशी मागणी नागरिक करीत होते पावसाचे पाणी वाढल्यास दोन्ही बाजू कडील नागरिकाना पायी जाता येत नाही किंवा दुचाकी घेऊन जाता येत नाही रात्री च्या अंधारात या ठिकाणी अपघात होण्याच्या घटना या पूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासना कडे त्वरित पूल बांधून देण्याची मागणी केली होती.
ओढ्यावरील पूल वाहून गेल्यावर त्याची दुरुस्ती पाईप टाकणे ,मुरूम टाकणे आदी कामे स्थानिक नागरिकांनी केली. त्या मुळे जामदार रोड ते मोरगाव रोड टोल नाक्या कडे जाणाऱ्या लोकांची सोय झाली लोक सहभागातून तात्पुरती दुरुस्ती केली, पण प्रशासनाने कायम स्वरूपी मजबूत पूल व्हावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे,
सदर कामात दळवी वस्ती, मोरे वस्ती, ढवाण वस्ती व गट न 147 चे सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी श्रमदान,वृषारोपन व लोक वर्गणी साठी सहकार्य केले.