वाहनांचे बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्यावर वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर मार्फत कारवाई

सातारा दि.11 ( जिल्हा माहिती कार्यालय )  सातारा जिल्हयात पोलीस दलामार्फत ई-चलान प्रणालीव्दारे कारवाई सुरु आहे. सदरची कारवाई करीत असताना गाडीच्या चुकीच्या नंबरप्लेट बाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख, उप विभागीय पोलीस अधिकारी सातारा, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा संदिप भागवत यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर नेमणुकीचे अधिकारी/कर्मचारी यांनी विशेष मोहिमद्वारे सातारा शहरात वाहन MH-11-CC-8887 हा चुकीचा नंबर लावुन दोन सुझुकी ॲक्सेस वाहन चालक गाडी वापरत असल्याचे आढळुन आले हा नंबर हा आर.टी.ओ. ऑफिसकडील नोंदी नुसार हिरोहोंडा स्प्लेंडर गाडीचा आहे. सदरची गाडी ही श्रीधर रामदास जगदाळे रा.कुमठे, ता. कोरेगाव यांच्या मालकीची आहे. त्यांनी त्यांच्या मालकीच्या गाडीवर दंडाची आकारणी होत असल्याची तक्रार केलेली आहे. चुकीचा नंबर लावुन वाहनांचा वापर केल्या प्रकरणी सुझुकी ॲक्सेस वाहन चालक  अनिल कस्तुरे रा.करंजे ता.जि.सातारा याच्या विरोधात पो.हवा.शिंदे ब.नं.659 यांनी शाहुपूरी पोलीसठाणे येथे तसेच सुझुकी ॲक्सेस वाहन चालक राहुल चंद्रकांत माने मालक निशिकांत सुनिल पिसाळ दोन्ही रा. रघुनाथपुरा पेठ करंजे सातारा यांचे विरोधात पो.ना. अरुण पाटील ब.नं.1968 यांनी तक्रार दिल्याने सातारा शहर पोलीसठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद कारवाई सपोनि शेलार, सहा.पो.फौ. अनिल धनवडे, दशरथ कदम, पो.हे.कॉ. सुरेशशिंदे, विजय शिंगटे, पो.ना. अरुण पाटील, मनोज मदने, संदिप वाघमारे पो.कॉ.आनंदराव भोसले यांचे पथकाने केली आहे.  
        वाहन चालकांकडुन वाहनांस फॅन्सी नंबरप्लेट तसेच विहीत नमुण्यातील नंबरप्लेट न लावण्याचे प्रमाणात वाढ झालेली असुन ई-चलान मशीनव्दारे कारवाई करीत असताना गाडीच्या नंबरचे आकलन व्यवस्थीत होत नसल्याने दुसऱ्यांचे गाडीवर कारवाई होवू लागली आहे. वाहनांचे नंबर प्लेट बाबत वाहन धारकांनी सजग होणे आवश्यक असुन या पुढे विहीत नमुनामध्ये नंबर नसणारेतसेच चुकीचा नंबर व वाहतूक नियमांचे उल्लंघण करणारे वाहन चालकांचे विरोधात विशेष मोहिम राबवून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालण करणेचे आवाहन वाहतूक शाखेचे सहा.पो.निरीक्षक, व्ही.ए.शेलार यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!