बारामती:
नाशिक येथील शिक्षकध्येय मध्यम समूहा च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी. म.ए.सो.सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा,बारामती च्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता विलास चव्हाण. यांच्या उपक्रमाची निवड करण्यात आली. हा राज्यस्तरीय कर्तृत्ववान मुख्याध्यापिका पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी बारामती नगरपरिषद च्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,उप नगराध्यक्ष तरन्नुम सय्यद गटनेते सचिन सातव,प्रांताधिकारी दादासो कांबळे व इतर पदाधिकारी,अधिकारी उपस्तीत होते.
5 सप्टेंबर 2020 शिक्षकदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार ही सौ.सुनिता चव्हाण यांना जाहीर झाला आहे.अध्यापनाचा 33 वर्षांचा अनुभव असलेल्या सौ.सुनिता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठीही शाळेत विविध उपक्रम राबविले आहेत. मुख्याध्यापक म्हणून गेल्या 2 वर्षात एकूण 5 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.