सातारा दि. 8 ( जि. मा. का ) गेल्या दोन महिन्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय लॅब मध्ये आज तारखे पर्यंत 20 हजार 236 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या त्यात 7614 एवढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 11हजार 432 एवढे निगेटिव्ह निघाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली.
11 ऑगस्ट 2020 रोजी आर.टी. पी.सी.आर. लॅब सुरु करण्यात आली तेंव्हा पासून आज पर्यंत अविरत काम सुरु असून यासाठी 12 तंत्रज्ञ, 2 डॉक्टर, 2 डेटा ऑपरेट आणि तीन कार्यालयीन सहाय्यकाच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. आज पर्यंत फक्त 374 एवढे नमुने बाद झाले आणि 811 एवढे नमुने अनिर्णित राहिले असल्याची माहिती डॉ सारिका बडे, पॅथॉलॉजिस्ट, डॉ तेजस्विनी पाटील, मायक्रोबायलॉजिस्ट, डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी दिली.