बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान चे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स इंजिनीअरिंग हि नवीन ब्रँच शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ सुरु करण्यासाठी एआयसिटीई आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांचेकडून मान्यता मिळाली आहे. सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स हा उदयोन्मुख अभ्यासक्रम आहे. आयटी इंडस्ट्री मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स चे ज्ञान असणाऱ्या इंजिनीअर्सची मोठी मागणी आहे आणि हीच मागणी लक्षात घेऊन महाविद्यालयाने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स डेटा सायन्स इंजिनीअरिंग हि नवीन अभियांत्रिकी ब्रँच सुरु केली आहे. महाराष्ट्रातील काही ठराविक इंजिनीअरिंग महाविद्यालयामध्येच हा नवीन कोर्स सुरु होत आहे.
महाविद्यालयाच्या नवीन कोर्स सुरु करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स इंजिनीअरिंग ला ऍडमिशन मिळू शकणार आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स इंजिनीअरिंग हा ४ वर्षाचा फुल टाइम अभ्यासक्रम असून या कोर्ससाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता ६० आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स इंजिनीअरिंग या कोर्स शिवाय महाविद्यालयात कॉम्पुटर इंजिनीअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग, ईलेकट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन्स इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, आणि सिव्हिल इंजिनीअरिंग हे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत.
प्रथम वर्ष इंजिनीअरिंगचे प्रवेश लवकरच सुरु होणार असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स इंजिनीअरिंग आणि इतर इंजिनीअरिंग कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयाचे ऍडमिशन कोऑर्डिनेटर प्रा. अनिल डिसले (मोबाईल नंबर ९४२१९३८९४०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. आर एस बिचकर यांनी केले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स इंजिनीअरिंग या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी डीटीई चॉईस कोड ६२८४९९५१० हा आहे.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक ठरले आहे. गेल्या दोन वर्षात महाविद्यालयातील ५५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऑन व ऑफ कॅम्पस प्लेसमेंटद्वारे चांगली नोकरी मिळाली आहे. आर्थिक मंदीच्या काळातही महाविद्यालयाने कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या दर्जेदार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे यांनी दिली आहे.