पीक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी इफको किसान अँप उपयुक्त: सायली नेवसे

आसू (राहूल पवार ) :शेतकऱ्यांसाठी इफको किसान (Iffco kisan ) अँप उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कृषिकन्या सायली नेवसे हिने केले . पाडेगाव येथे जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या म्हणून शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात शेतकऱ्यांना माहिती देताना त्या  बोलत होत्या.  त्यानी पीक तंत्रज्ञानासाठी अँप्स व डिजिटल माध्यमांचा उपयोग आवश्यक आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. शेतकऱ्यांनी या लिंकवरती नोंदणी करावी . या अँपवर हवामान, किड, रोग, जनावरे , खत व्यवस्थापन, कसे करावे याबद्दल माहिती भेटेल.  शेतकऱ्यांनी डिजिटल युगामध्ये कसे अपडेट राहिले पाहिजे याप्रसंगी नेवसे यांनी शेतकऱ्यांना विविध प्रकारची अँपसंबंधित व शेतमाल ऑनलाईन कसा विकायचा याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये पाडेगावचे कृषिमित्र व अन्य शेतकरी उपस्थित होते.  सायली नेवसे यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!