फलटण : सध्या कोरोना महामारी मुळे सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त झाले आहे. महामारी असली तरी कामानिमित्त प्रवास सुद्धा आवश्यक आहे ,
याकरता महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस टीने प्रवाशांना सुरक्षित आरोग्यदायी प्रवास देण्याचे कार्य सुरू केले आहे याकरिता एसटीच्या सर्व बसेस स्वच्छ करणे सँनी टाईज करणे याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे .
प्रत्येक आगारात बसेस सँनटाईज करुनच मार्गावर पाठवल्या जात आहेत, याच पार्श्वभूमीवर फलटण आगारातील वाहक श्रीपाल जैन बसमधील प्रवाशांना तिकीट देण्यापूर्वी त्यांच्या हातावर सॅनिटायझर देत आहेत ,मगच तिकीटे देत आहेत यामुळे प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करताना दिसून येत आहेत .वाहक जैन यांच्या या कामगिरीबद्दल विभाग नियंत्रक सागर पळसुले,आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ ,स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर ,वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज आहिवळे, नंदकुमार सोनवलकर यांनी अभिनंदन करून सर्वच वाहकांनी चालकांनी खबरदारी घेऊन आपले व प्रवाशांचे आरोग्य सांभाळावे असे आवाहन केले आहे. तसेच प्रवाशी बंधु-भगिणी यांनी निर्धास्त पणे एस.टी.बसने प्रवास करावा असे आवाहन केले आहे.