फलटण :-धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याची माहिती पै. बजरंग गावडे यांनी दिली आहे.
माळशिरस येथे नुकतीच धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र कार्यकारणीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ होण्यासाठी दिशा ठरविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शांततेने निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या बैठकीला सुभाष पाटील खेमनर, दादासाहेब काळे, परमेश्वर कोळेकर, डाॅ. मारुतीराव पाटील, बजरंग नाना खटके, गणपतराव वाघमोडे, शिवाजीराव इजुगडे, विठ्ठलनाना पाटील, शिवाजीराव पाटील, पांडूरंग तात्या वाघमोडे, विष्णू देशमुख, बजरंग नाना गावडे, पंकज देवकाते, अमोल खरात, किरण गोफणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना प्रत्येक तालुक्यातील धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य 1 ऑक्टोबर रोजी शांततेच्या मार्गाने निवेदन देणार आहेत. यावेळी धनगर समाजातील पदाधिकारी व धनगर बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ नेते बजरंग नाना खटके व पै. बजरंग गावडे यांनी केले आहे.