सागर शहा
फलटण – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर सुधीर शहा यांना ठरलेल्या पैशापेक्षा जास्त पैशाची मागणी केल्यानंतर त्यास सागर शहा यांनी नकार दिल्याने चिडून जाऊन वर्धमान दोशी (पूर्ण नाव माहीत नाही)व त्याच्या इतर तीन साथीदारांनी तहसील कार्यालय आवारात जबर मारहाण केलेली असून सागर शहा यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान याबाबत सागर शहा यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात वर्धमान दोशी व इतर अनोळखी तिघे यांचे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या मारहाणीत सागर शहा यांच्या पोटाला जबर मार लागल्याने त्यांचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीमुळे वर्धमान दोशी व इतर जणांना अजून अटक करण्यात आली नाही.
या बाबत अधिक माहिती अशी की सागर सुधीर शहा व वर्धमान दोशी यांच्यामध्ये ठरलेल्या एका व्यवहारा प्रमाणे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर रजिस्टर ऑफिस येथे व्यवहाराची नोंद करण्यासाठी सर्व जण आलेले होते. परंतु वर्धमान दोशी यांनी ठरलेल्या व्यवहारापेक्षा जास्त पैशाची मागणी केली व त्यास सागर शहा यांनी नकार दिला, म्हणून चिडून जाऊन स्वतः व इतर साथीदारांनी सागर शहा यांना जबर मारहाण केली आहे. याबाबत सागर शहा यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद केलेला आहे. अशी माहिती सागर शहा यांनी दिलेली आहे.
दरम्यान युवा उद्योजक सागर शहा यांना झालेल्या मारहाणीचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात असून वर्धमान दोशी व इतर अनोळखी तिघे यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली जात आहे.