सातारा दि. 29 : डिजिटल इंडिया अंतर्गत महाराष्ट्र शासनमार्फत महा डीबीटी (Maha-DBT) पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती स्वत:च्या खात्यामध्ये थेड हस्तांतरीत करता येणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक, मुख्य शाखा सातारा आणि सातारा विभागातील सर्वटपाल कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप खाते उघडण्यासाठी प्रत्येक गुरुवारी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी पात्र शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना आपली शिष्यवृतती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून निशुल्क प्राप्त करुन घेण्यासाठी नजीकच्या टपाल कार्यालयात जाऊन अेडिया पोस्ट पेमेंट बँकेचे पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप खाते उघडण्याचे आवाहन श्रीमती अपराजिता म्रिधा, प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग सातारा यांनी केले आहे.