बारामती ; ‘कोरोनासंसर्गजन्य काळातही महिलांना सणवार उत्स्फूर्तपणे साजरे करता यावेत,पारंपारिकतेबरोबरच महिलांच्या कलाकौशल्यातूनही जनजागृतीपर संदेश देता यावा या अनुषंगाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते’ अशी माहिती रागिणी फाऊंडेशनच्या संचालिका राजश्री आगम यांनी दिली.
यामध्ये महिलांनी ‘कोरोना ‘ या विषयावर आधारित गौरी आरास करणे गरजेचे होते. या मध्ये महिलांनी कोरोनाकाळातील वैद्यकीयसेवा,डॉक्टर,आरोग्यकर्मचारी,पोलीस,ऑनलाईन शिक्षणप्रणालीचा होत असलेला अवलंब यावर भाष्य करणारी गौरी आरास केली होती,या आरास मधून मास्क वापरासंबंधीचे संदेश ,कोरोनावर मात करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी,कोरोना पासून बचाव होण्यासाठी घ्यावयाची दक्षता,प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती काढ्यांचे महत्व अश्या वैविध्यपूर्ण गोष्टींचा समावेश करून गौरी आरास मधून जनजागृती करण्याचा आगळा-वेगळा प्रयत्न महिलांनी केला होता. या स्पर्धे मध्ये महिलांनी गौरीआरस चे व्हिडीओ रागिनी फाऊंडेशन कडे पाठवायचे होते.या व्हिडीओला सादरीकरण,संदेश,मांडणी,एकूण प्रभाव,व्हीव्हज,लाईक या घटकांच्या सहाय्याने परीक्षकांकडून गुणांकन करण्यात आले. स्पर्धेत अनुक्रमे-
१)प्रथम क्रमांक – सौ. दिपाली मिलन साळुंखे (जराडवाडी)
२) द्वितीय क्रमांक –
डॉ. हिमगौरी वडगावकर (बारामती)
३) तृतीय क्रमांक – सौ. शुभांगी पवार (माळेगाव)
४) उत्तेजनार्थ –
१)सौ.सुषमा नांदे (सोमेश्वर)
२) कु.अमृता तंटक यांनी मिळवले.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.सीमा नाईक-गोसावी व जेष्ठ शिक्षिका रेखा आळंदकर यांनी केले. या स्पर्धेसाठी बारामती,सातारा,इंदापूर,भोर, पंढरपूर,बीड, वाळवा,पुरंदर , धायरी या परिसरातून महिलांनी सहभाग दर्शवला होता,या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सौभाग्य होलसेलसाडी डेपो येथे पार पडला.या उपक्रमासाठी सौभाग्य होलसेल साडी डेपोचे संचालक.राहुल चव्हाण,संतोष बांदल,अनिल कोकरे,विवेक भोसले,अस्मिता कोकरे,कोमल बांदल उपस्थित होते.तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महालक्ष्मी ट्रेडिंगचे श्.नितीन पारेख तसेच प्रकाश शिंदे,ऋतुजा आगम,ऍड विना फडतरे,मयूर साळुंखे,पूजा बोराटे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळे- पाटील यांनी केले.