फलटण : लायन्स क्लब फलटण गोल्डन व लायनेस क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आज आदर्श शिक्षक पुरस्कार व हिंदी दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम अतिशय नियोजपूर्वक साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन उज्वलाताई निंबाळकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्राचार्य श्री.रवींद्र येवले सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक लायनेस अध्यक्षा लायन नीलम लोंढे -पाटील यांनी केले, यावेळेस नीलम लोंढे-पाटील मॅडम यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांना त्यांच्या कामासाठी प्रेरणा दिली.तसेच त्यांचे विविध उपक्रम कशाप्रकारे राबवले जातात याची माहितीही त्यांनी प्रास्ताविकात दिली. शिक्षक पुरस्काराला उत्तर देताना श्री.गणेश तांबे यांनी या पुरस्कारामुळे आम्हा शिक्षकांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे असे म्हटले, व या सुंदर कार्यक्रमाबद्दल संयोजकाचे आभार व्यक्त केले. यानंतर प्रमुख पाहुणे प्राचार्य श्री.येवले सर यांनी शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवणारा देवदूतच असतो असे गौरवोद्गार काढले ,तसेच आदर्श पुरस्कार हा फक्त शिक्षकांना दिला जातो, इतर कोणालाही दिला जात नाही, याचं कारण शिक्षक हा भावी पिढी घडवण्याचा प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे कार्य करत असतो. शिक्षक व विद्यार्थी यांचा गौरव केल्याबद्दल त्यांनी क्लबचे व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा लायन उज्वलाताई निंबाळकर मॅडम यांनी शिक्षक हा समाजाला दिशा देण्याचे कार्य करत असतो, त्यामुळे शिक्षकाचे स्थान उच्च आहे.शिक्षकांनी भविष्यात ही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमात फलटण तालुक्यातील आदर्श शिक्षक गणेश भगवान तांबे,रेखा केशव सस्ते,अशोक आबुराव रणवरे,उषाताई भिमराव सुतार,शोभा शिवाजी माळवदकर,शुभांगी आबासो शिंदे,अमोल दशरथ चवरे, निलेश प्रभाकर कर्वे,अरुण शंकर कांबळे,रितेश्वर आनंदा गायकवाड,सुषमा भरत राऊत,मनीष तुकाराम निंबाळकर या 12 आदर्श शिक्षकांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
तसेच निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मेडल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच लायन्स क्लब फलटण गोल्डन व लायनेस क्लब फलटण यांच्या वतीने covid-19 प्रतिबंध जनजागृतीसाठीची सुमारे 1000 पत्रके वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास रीजन चेअरमन लायन बाळासाहेब भोंगळे, रिजन सेक्रेटरी लायन तुषार गायकवाड,लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष लायन प्रमोद जगताप, लायन अर्जुनराव घाडगे, लायन सुहास निकम, लायन मंगेश दोशी,लायन रणजीत निंबाळकर, लायन विजय लोंढे पाटील, लायन मंगल घाडगे, लायन नीलम देशमुख,लायन पवार मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन नीलम देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विजयजी लोंढे-पाटील मा.शिक्षण सभापती शिक्षण मंडळ नगरपालिका फलटण यांनी केले.
या कार्यक्रमाचे अतिशय नियोजनपूर्ण, काळजीपूर्वक अत्यंत कमी वेळेत ,सुंदर नियोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी सर्व पुरस्कारार्थी शिक्षक उपस्थित होते.