बारामती: कामगार कायद्यांमध्ये केंद्र सरकारने बदल करून कामगार ही संकल्पनाच संपवण्याचे काम हे सरकार करत आहे याचा निषेध म्हणून कामगार जागृती पत्रके प्रत्येक कंपनीत वाटण्यचा उपक्रम राज्य राष्ट्रवादी कामगार सेल चे संघटक व श्रायबर डायनामिक्स डेअरी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी केला.
कामगारांना कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेऊन वापरा व फेकून द्या अशी कामगाराची दुरवस्था केली आहे
कामगारांनी लढे देऊन कामगारांसाठी कामगार हिताचे कायदे करून घेतले परंतु या केंद्र सरकारने या कामगार हिताच्या कायद्याची पायमल्ली केली आहे आपल्या देशातील कामगारांच्या श्रमाची व कष्टाची अवहेलना केली आहे कामगारांच्या घामाला व श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या या केंद्र सरकारचे जाहीर निषेध करीत असल्याचे नानासाहेब थोरात यांनी सांगितले.
*