बारामती:ऑडिटर्स कौन्सिल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यपदी बाळासाहेब वाघ यांची निवड करण्यात आली आहे.
आॅडीटर्स कौन्सिल वेल्फेअर असोसिएशनची 24 सप्टेंबर रोजी स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या सदस्यपदी लेखापरिक्षक बाळासाहेब वाघ यांची निवड करण्यात आली असून असोसिअशनचे अध्यक्ष रामदास शिर्के यांनी निवडीचे पत्र दिले.
यावेळी जिल्हा सचिव उमेश देवकर,संदीप नगरकर,दत्तात्रय पवार,संजय घोलप,बाळासाहेब देशमुख,श्रीकांत चौगुले उपस्थित होते. या संघटनेत जास्तीत जास्त सभासद नोंदणी करुन आॅडीटरच्या अडीअडचणी सोडवु असे निवडी नंतर बाळासाहेब वाघ यांनी सांगितले.