फलटण दि.23 : नवीनशैक्षणिकधोरण सन-२०२०शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धेचा तालकास्तरीय निकाल आज जाहिर झाला, यामध्ये बिबी केंद्रातील जि.प.शाळा कारंडेवस्ती चे उपशिक्षक श्री.गणेश भगवान तांबे यांचा पोस्टर स्पर्धेमध्ये प्रौढ शिक्षण या विषयांमध्ये फलटण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे.श्री.गणेश तांबे हे उपक्रमशील शिक्षक आहेत. नुकताच सातारा जिल्हा परिषदेचा त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये ते सहभाग घेत असतात. गणेश तांबे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल फलटण तालुका पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री.रमेश गंबरे साहेब, बिबी-आदर्की केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. गजानन शिंदे साहेब, गिरवी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अनिल कदम साहेब,शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोहन बोबडे सर या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.