फलटण – फडतरवाडी ता.फलटण येथे आत्तापर्यंत अकरा लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या मध्ये दुर्दैवाने तीन लोकांचा मृत्यू झाला असून याकडे प्रशासन लक्ष देत नसून हे प्रशासनाच्या अनास्थेमुळे बळी गेलेत असा गंभीर आरोप प्रगतशील बागायतदार कल्याण काटे यांनी केला आहे.
फलटण तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तर या मध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र जास्त व चिंताजनक आहे. त्यातच सध्या अनेक ग्रामपंचायती मध्ये प्रशासक नेमले आहेत.मात्र एक प्रशासक व ५ ते ६ गावे त्यांचेकडे आहेत.मग प्रशासक कधी भेटणार? तो काय गावासाठी उपाययोजना करणार?लोकांची आरोग्य तपासणी साठी पथके कधी नेमणार?गावातील मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणे,या ठिकाणी औषध फवारणी,स्वच्छता मोहीम कधी करणार?असे एक ना अनेक प्रश्न पडत आहेत. दरम्यान अशी कामे रखडली असून ग्रामस्थांनी नक्की कोणाकडे दाद मागायची?का सर्वसामान्य लोकांनी मरणयातना अशाच भोगायच्या?असा प्रश्न प्रगतशील बागायतदार कल्याणराव काटे यांनी उपस्थित केला आहे.
गेली सहा महिने झाले या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली कामे तुटपुंजी ठरत असून कोरोनाचा नायनाट करायचा असेल तर संपूर्ण फडतरवाडी गाव,वाड्या वस्तीवर जाऊन लोकांच्या आरोग्याची तपासणी गरजेची आहे.त्याच बरोबर आतापर्यंत कोरोनाने बाधित झालेल्या कुटुंबातील लोकांच्यात या कोरोनाची दहशत पसरली आहे. तर दिवसेंदिवस बधितांचा आकडा वाढत आहे. तसेच मृत्यू चे प्रमाण ही वाढले असून फडतरवाडी येथे नेमलेल्या प्रशासकाने एक रोड मॅप बनवून बधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे कल्याणराव काटे यांनी सांगितले आहे.
साधारणपणे साडेतीन चार हजार लोकसंख्या असलेले फडतरवाडी गाव हे ७ ते ८ ठिकाणी वाडीवस्तीवर लोक राहत आहेत.मात्र या ठिकाणी आरोग्य विभाग अथवा आरोग्य यंत्रणा पोहोचली नसून लोकांना वाऱ्यावर सोडले आहे की काय?असा प्रश्न काटे यांनी उपस्थित केला आहे.