ज्ञानेश्वर कुंभार यांना मोतीलाल शहा तर्फे व्हीलचेअर भेट
पुणे : सौ.सुशिलाबेन मोतीलाल शहा ट्रस्ट तर्फे दि.18 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता जेष्ठ समाजसेवक मोतीलाल शहा यांचे हस्ते ज्ञानेश्वर कुंभार मुळगाव पांगरी ,बार्शी सध्या मुंबई दवाखान्यात ऍडमिट असुन त्यांचे तर्फे त्यांचे ओळखीचे विकास गोळे ,भोर रोज मुबंई ला पिकअप गाडीतून दूध घेऊन जाणारे त्यांचे कडे व्हीलचेअर भेट दिली ते मोफत पोहच करणार आहेत .
यावेळी फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक, सौ.सुशिलाबेन शहा,मनोज शहा उपस्थित होते.
या वेळी रघुनाथ ढोक म्हणाले की या पद्धतिने मागील दीड दोन वर्षात 200 पर्यन्त व्हीलचेअर प्रत्येकी रुपये 5000/5500 तर तीन चाकी सायकल रुपये 7500/8000 उत्तम टिकणारी वाटप *सौ सुशिलाबेन मोतीलाल शहा ट्रस्ट मार्फत* मी काम करीत आहे ,या पूर्वी पण मोतीलाल शहा यांनी खूप वाटप केले आहेत.ते गरीब गरजु निराधार ,दिव्यांग साठी काम करणारी संस्था, व गोशाळा यांना प्रत्येकी 11हजार रुपये चा धनादेश 10 संस्थांना दरवर्षी देऊन मदत करतात,नुकतेच देहूगांव येलवाडी रोड येथील वात्सल्य निवासी मतिमंद शाळेला 5000रुपये चा धनादेश त्यांनी दिला आहे. तर दिवाळीत गरिबांना प्रत्यक्ष फराळ ,गरजु महिलांना साडी वाटप व इतर कोणी मेडिकल गरजु रुग्ण आले तरी मदत यथाशक्ती करतात व इतरांना प्रेरित करतात. आज मोतीलाल व सुशिलाबेन शहा या पती पत्नीचे वय 85/84 आहेत यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.असे दानशूर आहेत म्हणून समाज समतोल ,पीडितांना , गर्जुना मदत होत आहे.कोरोना काळात या पुढे असे दानशूर तयार व्हावेत आणि सर्वांनीच विवाह व इतर सर्व धार्मिक कार्य प्रसंगी आर्थिक उधळपट्टी न करता गर्जुना मदत करावी व सत्यशोधक पद्धतीने मुलांची विवाह व इतर कार्य पार पाडावीत असे देखील रघुनाथ ढोक म्हणाले.मनोज शहा यांनी आभार मानले.