बारामती:बारामतीतील योग महाविद्यालयाचे संचालक योगाचार्य डॉ निलेश महाजन व मानद व्याख्याते श्री विजय माढेकर यांची आयुष मंत्रालयाच्या योग प्रमाणीकरण मंडळाने नुकतीच तज्ञ योग प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे, त्या संबंधीचे पत्र योग प्रमाणीकरण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ईश्वर बसवरेड्डी यांच्याकडून उभयतांना देण्यात आले आहे.
भारतातील योग शिक्षणाचे व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी आयुष मंत्रालयातर्फे योग प्रमाणीकरण मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळातर्फे देशामध्ये विविध ठिकणी योग विषयक लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ,चार स्तरावर घेतल्या जातात, प्रत्येकाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती वेगवेगळ्या असतात. या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून योग विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची निवड केली जाते. ही निवड करताना योग परीक्षकांचे योगक्षेत्रातील शिक्षण , ज्ञान, प्रत्यक्ष योग शिक्षणाचा अनुभव आणि कारकीर्द तपासली जाते.
योगाचार्य डॉ निलेश महाजन हे गेले 15 वर्षांपासून पुणे व बारामती शहर याठिकाणी जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन च्या माध्यमातून योग विषयक प्रचार व प्रसार करीत आहे. आयुष मंत्रालयाच्या विविध योग विषयक योजना राबविण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. बारामतीमध्ये नव्याने सुरू झालेल्या योग महाविद्यालयाचे ते संचालक म्हणून कार्यरत आहे. या महाविद्यालयामध्ये योग विषयामध्ये डिप्लोमा, पदवी ते पदव्युत्तर शिक्षण देण्यात येते.
ठाणे येथील श्री विजय माढेकर हे याच विद्यालयात मानद व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत, योग विषयामध्ये ते सध्या पी एच डी करीत आहेत, गेल्या 15 वर्षांपासून तेही योग क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. या पूर्वीही त्यांनी अनेक योग परीक्षांमध्ये परीक्षक म्हणून कार्य केले असून पूर्ण भारतभरात सुमारे 2000 हुन अधिक विद्यार्थ्यांचे परीक्षण केले आहे