कापूरहोळ वार्ताहर : सन 2020-21 करीता महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत ट्रॅक्टर, पावर टिलर व इतर औजारे घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण योजनेत सहभाग घ्यायचा आहे अश्या शेतक-यांनी स्वतः किवा आपल्या जवळच्या सीएससी (महा ई सेवा केंद्र) केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
त्यासाठी आधार कार्ड बँक पासबुक,सातबारा,आठ अ,पँन कार्ड / मतदान कार्ड आयकार्ड साईज फोटो
एस.सी.,एस.टी.असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे,जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भोर पंचायत समितीचे मा. उपसभापती लहू नाना शेलार यांनी केले आहे.
https://mahadbtmahait.gov.in/ ,https://mahadbtmahait.gov.in/farmer/login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावेत.ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे याशिवाय शासनाच्या यांत्रिकीकरण या योजनेत सहभागी होता येणार नाही. तेव्हा ज्या शेतकरी बांधवानी सहभागी व्हायचे त्यांनी नोंदणी करावी ही विनंती भोर पंचायत समितीचे मा. उपसभापती लहू नाना शेलार यांनी केली आहे.