फलटण :फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचा…देव समान,जाणता राजा…. आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कोरोना संकटकाळी हितकारक घेतलेला निर्णय हा खरोखरच एक आदर्श असा उपक्रम आहे .
फलटण शहरात वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी, फलटण तालुक्यातील गावामधून शेतकरी बांधवांची मुले ही होस्टेल , किंवा रुम घेऊन राहत असताना, “कोरोना” च्या पाश्वऺभूमीवर, तसेच इतर प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती मुळे सर्व शेतकरी बांधव हे आर्थिक संकटात सापडले आहेत… शेतकरी बांधवांच्या मुलांना शिक्षणासाठी अडचण येऊ नये म्हणून तसेच शिक्षण घेत असताना त्यांच्या वरती उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी, आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दोन वेळचे जेवण पूर्ण महिना फक्त रु . ९९९ /- मध्ये देण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे.
आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण याला साजेसा असा उपक्रम राबवून महाराष्ट्रातील इतर कृषीउत्पन्न बाजार समितींपुढे एक आदर्श निर्माण केला आहे .