फलटण : माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या महत्वकांक्षी योजनेतील आपल्या गावात,वाडीवस्तीवर आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबातील लोकांची माहिती द्या.घरातील कोणत्याही व्यक्तीला थंडी,ताप,खोकला व तत्सम आजाराची लक्षणे दिसून येत असतील तर त्याची कल्पना देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या रेश्माताई भोसले यांनी केले आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोहीम हाती घेतली आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत आशा अंगणवाडी सेविका व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची तपासणी,व घ्यावयाची काळजी या बाबत जनजागृती करण्यात येत आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा रेश्माताई भोसले या होळ व आसपासच्या वाडीवस्तीवर स्वतः सामील झाल्या होत्या.या वेळी त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना आवाहन केले आहे की घरातील सर्वांची आरोग्य तपासणी करून घ्या.काहीही लक्षणे दिसून आलेस साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेटून त्या वरील ईलाज करून घ्या.थंडी,ताप,खोकला व तत्सम आजार अंगावर काढू नका.तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.
दरम्यान सध्या लॉकडाऊन उठल्याने ग्रामीण भागातील अनेक गावात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या बाबत तसे कोण आलेले आढळलेस ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत कळवा तसेच त्यांच्या संपर्कात लगेच जाऊ नका.त्यांनी परगावाहून येताना आरोग्य तपासणी केली आहे का?याची खात्री करून घ्या.असे आवाहन भोसले यांनी केले आहे.पावसाळा सुरू आहे. या कालावधीत आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून आपली स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे रेश्माताई भोसले यांनी फलटण तालुका वासीयांना केले आहे .