भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश तर्फे *भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मानरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त* सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
यामध्ये 14 ते 20 सप्टेंबर सेवा सप्ताहामध्येदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये 14 ते 20 सप्टेंबर सेवा सप्ताहामध्येदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून सातारा येथील के.एस डी.शानभाग विद्यालयात भाजप डॉक्टर संघटनेच्यावतीने विद्यालयातील सर्व कर्मचारी तसेच शिक्षकांसाठी covid-19 जनजागृती आणि घ्यायची काळजी याबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विठ्ठल बलशेटवार,जिल्हा सरचिटणीस भाजपा,, विकास गोसावी शहराध्यक्ष सातारा,, डॉ. उत्कर्ष रेपाळ, जिल्हा अध्यक्ष वैद्यकीय आघाडी भाजपा सातारा,, राहुल शिवनामे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सातारा,,डॉ. वीरेंद्र घड्याळे शहराध्यक्ष वैद्यकीय आघाडी भाजपा सातारा,,विक्रम बोराटे शहराध्यक्ष युवा मोर्चा भाजपा सातारा तसेच के.एस डी.शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग सहभागी झाले होते.
सामाजिक अंतर राखणे, घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे ,सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे आदी बाबत मार्गदर्शन या वेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
यावेळी बोलताना रमेश शानभाग यांनी भाजप शहर शाखेचे विविध उपक्रम हे समाजासाठी मार्गदर्शक आणि उपयोगी असून सध्याच्या करोना च्या भीषण संकटांमध्ये वाढदिवसाच्या साठी औचित्य साधून केवळ केक कापणे आणि वाढदिवस साजरे करणे असा प्रकार न करता समाजभान लक्षात घेऊन आयोजित केलेले हे उपक्रम खरोखरच स्तुत्य असल्याचे सांगितले.