कांदा निर्यातबंदी व पोलीस भरती बाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक

 निवेदन देताना संभाजी ब्रिगेड चे विनोद जगताप व इतर पदाधिकारी (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती: दि. 14 सप्टेंबर 2020 रोजी वाणिज्य मंत्रालय भारत सरकार द्वारा तात्काळ कांदा निर्यात बंदी करण्यात यावी ही जाचक सूचना देण्यात आली. या अनुषंगाने दिनांक 14 सप्टेंबर 2020 हा सबंध भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी काळा दिवस ठरला आहे. ठासळलेली अर्थव्यवस्था, करोना महामारी, नेहमीचा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणा,  बोगस बियाणे, जीएसटी, नोटाबंदी इत्यादी संकटांनी शेतकरी त्रासलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. .  आहे. ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकार सरकारचं धोरण’ हे कांद्याची निर्यातबंदी करून सरकारने सिद्ध केलं आहे. केंद्र सरकारने त्वरीत कांदा निर्यात बंदी उठवावी 
तसेच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 ला दिलेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला जबर फटका बसला आहे. मराठा समाज कायम आरक्षणापासून वंचित राहिला आहे. तेव्हा आता मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरुपाची शासकीय भरती करण्यात येऊ नये. . अशा मागण्यांची दोन निवेदने संभाजी ब्रिगेडच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले. जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. या प्रसंगी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष विनोद जगताप, उपाध्यक्ष तुषार तुपे, संघटक सोमनाथ जाधव, विशाल भगत, संकेत जगताप, दत्तात्रय साबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!