आसू (राहुल पवार ) : आसू पूर्वभागामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या दरम्यान आसू येथे उसाच्या शेतात वीज पडल्याने शेतातील दीड एकर उसाला आग लागली त्यामध्ये एक एकर ऊस जळून खाक झाला असून . सदर शेतकरी बबन भिकोबा राजेशिर्के यांची आसू शिवारात गट क्रमांक ८६(१) मधील शेत जमीन आहे .
बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परिसरात विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच वेळी अचानक शेतामध्ये वीज पडून उसाला आग लागून ऊस जळून खाक झाला. बबन भिकोबा राजेशिर्के या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आधीच कोरोना संकटाच्या काळात बळीराजा पिसला गेला आहे त्यात हे आसमानी संकट या दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे .
तरी सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडले आहे . अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांला शासनाकडून तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांने केली आहे .