बारामती : बुधवार दि. १६ सप्टेंबर पासून बारामती शहरातील नागरिकांची बारामती नगर परिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी घेतली जात आहेत. यामध्ये प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नटराज नाट्य कला मंडळाचे सदस्य प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी कार्यात सहभागी झाले होते नटराजचे अध्यक्ष किरण गुजर यांनीही नागरिकांची थर्मल मीटर द्वारे तपासणी केली नटराजचे सदस्य अमर महाडिक, सचिन आगवणे, दीपक मुळे, श्रीकांत गालींदे, अक्षय महाडिक, संजय खडके, विनय आगवणे, मलिकार्जुन हिरेमठ, सचीन होळकर हे सहभागी होते
यामध्ये नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणेसाठी जागृती करने तसेच यामध्ये ज्या नागरिकाना लक्षणे आढळतात त्यांना शारदा प्रांगण शाळा न ७ येथील तपासणीसाठी नेहण्यात आले. या मध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडतील अशा नागरिकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात, व यातील लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची सोय नटराजच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटर मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले जात आहे या पुढील काळात सर्व प्रभाग मध्ये कोरोना चाचणी साठी नटराज प्रशासन बरोबर कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले