सातारा :
सेंद्रिय शेती ही आधुनिक काळाची गरज आणि यशाचे सूत्र सत्यात उतरवणारे यशस्वी शेतकरी अर्जुन तात्याबा फरांदे.
ओझर्डे तालुका वाई येथे राहणारे अर्जुन फरांदे यांचे चार एकर जमीन आहे. आधी केलेची पाहिजे या उक्ती आचरणात आणून त्यांनी सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. तसेच इतर गावातील शेतकरी मित्र यांना स्वतः त्यांच्या शेतावर जाऊन त्यांना सेंद्रिय शेतीचे ज्ञान देतात. तसेच सेंद्रिय शेती कशी करावी याचे मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकही दाखवतात. गावामध्ये त्यांचे यशस्वी तसेच एक होतकरू मार्गदर्शक शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांची मोठी मुलगी तिला लहानपणीच अर्धांगवायू झाला. त्यांनी बरेच डॉक्टरांना दाखवले. परंतु तिच्यावर काहीही फरक पडला नाही. यातूनच त्यांना सेंद्रिय शेतीची म्हणजेच झिरो बजेट शेतीची कल्पना उदयास आली. सेंद्रिय शेतीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा वापर न करता मिश्र पद्धतीची शेती करतात. तसेच सेंद्रिय गुळ व सेंद्रिय हळद यांची विक्रीचा व्यवसाय करतात.
जीवस्य जीवनम् म्हणजेच एक जीव दुसऱ्या जीवाला वाचवतो. या उक्तीप्रमाणे त्यांच्या घरातील जनावरांचे शेण, गोमूत्र शेतीला जोड देऊन सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली.
सेंद्रिय पद्धतीने किड व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी ताक, गोमूत्र, शेन, ताक निंबोळी अर्क, दशपर्णी, पंचगव्य यांचा वापर केला. तसेच बीज प्रक्रिया करण्यासाठी शेन आणि गोमूत्र यांचा उपयोग केला.
हळदीचे निरयात विविध राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये विक्री करतात वायगाव जातीचे
हळदीचे वान विविध आजारांवर औषधी असल्याने मोठ्या प्रमाणावर विविध देश व राज्यांमधून मागणी वाढली आहे. तसेच सेंद्रिय शेती बरोबर महिलांना व पुरुषांना रोजगार निर्मिती करून देत आहेत.
मालाच्या विक्रीसाठी व्हाट्सअप फेसबुककृषीच्या विविध ॲप द्वारे माहिती मिळवणे तसेच इतरांपर्यंत ही माहिती पोचवत आहे. तसेच प्रदर्शनात व शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नेहमी तत्पर असतात. या सहभागासाठी त्यांना अनेक ठिकाणी सन्मानित केले गेले आहे.
सेंद्रिय शेतीसाठी त्यांना महाराष्ट्र सरकारने पुरस्कृत ही केले आहे. सेंद्रिय शेतीसाठी 19 जानेवारी 2019 20 मध्ये सेवागिरी कृषी पुरस्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कृत केला आहे. जिद्द व चिकाटी असेल तर माणूस रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती म्हणजेच झिरो बजेट शेती करून कशी प्रगती करू शकतो. हे आज अर्जुन तात्याराव फरांदे यांनी दाखवून दिले आहे.
• संकलन :-कृषिकन्या
नेहा विद्याधर पुजारी,
कृषी महाविद्यालय पुणे.
• मार्गदर्शक :-डॉक्टर एच. पी. सोनवणे.
•केंद्रप्रमुख :-डॉक्टर आर. डी. बनसोड.
•कार्यक्रम:-अधिकारी डॉक्टर एस. एस. शिंदे
कृषी अभियांत्रिकी विभाग