आरोग्य तपासणी करतानाआरोग्य सेविका सौ.सुनीता लोंढे,आशा स्वयंम सेविका सौ.दुर्गा आडके, सौ.संगीता मचाले, गणेश जाधव
गोखळी (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात covid-19या आजाराचे प्रमाण ग्राणीण भागात वाढत आहे सध्या अनलाॅक मुळे सर्वांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. याचा एक भाग म्हणून सातारा जिल्हा परिषद आरोग्य विमागाअंतर्गत गोखळी वैद्यकीय उपकेंद्राच्या वतीने. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” अंतर्गत गोखळी येथे आज दि.15 सप्टेंबर पासून घरोघरी जावून नागरीकांनांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाची लक्षणे आढळणारे रूग्णांना तातडीने विलग करून उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. या मोहिमेत घर, कुटुंब ,परिसर, गाव आणि राष्ट्राच्या हितार्थ फेस मास्कचा वापर करणे ,शारीरिक अंतराचे पालन करणे, वारंवार हात धुणे ,कमीत कमी प्रवास करणे याबाबत लोकजागृती करण्यात येणार आहे. आपण सर्वजण एकजुटीने जागरूत राहून संयमाने आणि धिराने या संकटाचा सामना करूया माझे कुटुंब माझी जबाबदारी हे कर्तव्य पार पाडुया या मोहिमे सक्रिय सहभाग नोंदवून आरोग्य पथकास सर्वोतो परी सहकार्य करावे व ही मोहीम यशस्वी करूया असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.