सातारा दि. 15 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना नावनोंदणी करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महास्वयमं वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
सेवायोजना नोंदण केलेल्या उमेदवारांनी जर आधार नंबर आपल्या नोंदणीशी संलग्न केला नसेल तर तो तात्काळ आपल्या नोंदणीशी संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
आपल्या नोंदणीला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 30 सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया न करणाऱ्यांची नोंदणी आपोआप रद्द होणार आहे.
सेवा योजना कार्डच्या नोंदणीला आधार कार्ड लिंक करण्यासाठी काही अडचण येत असल्यास या कार्यालयाच्या satararojgar1@ gmail.com या ई मेल वर माहिती द्यावी, अथवा 02162- 239938 या कार्यालयाच्या दूरध्वनी क्र वर संपर्क साधावा.