इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन च्या ऑनलाइन कॉन्फरन्ससाठी निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांचा सन्मान करताना संचालिका सौ .आचल घोरपडे ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी .
सातारा :
सातारा येथील के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या बारावी कला शाखेतील मानसी जाधव बारावीतिलच वाणिज्य विभागाच्या नेईल नंदकुमार गांधी यांनी नुकताच इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन च्या ऑनलाइन कॉन्फरन्ससाठी सहभाग घेतला होता .
ही कॉन्फरन्स युवकांच्या खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांना आलेले अनुभव याची चाचणी करण्यासाठी घेण्यात आली होती .या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना एखाद्याविषयी जास्तीत जास्त किती माहिती व ज्ञान आहे. त्यांची संशोधनात्मक दृष्टी व नाविन्यपूर्ण विषय हाताळण्याची कौशल्य आता कशाप्रकारे आहे .तिच्यामुळे जागतिक पातळीवरील अनेकविषयांवरील समस्यानिवारणासाठी युनायटेड नेशनच्या समितीला असे विषय सोडविण्यासाठी कशाप्रकारे मदत होईल .या कॉन्फरन्स मध्ये सध्या जागतिक स्तरावर आलेत्या आर्थिक संकटावर मात करण्या साठी आंतरराष्ट्रीय सुरक्षितता कशी सावधतेने या आर्थिक मंदीत बाळगता येईल आदी विषय होते.
अशाप्रकारचा आलेला अनुभव व त्यातून दर महिन्याला अशी कॉन्फरन्स घेतली जात आहे हा खरोखरच अलौकिक अनुभव असल्याचे सांगितले .12 हजार विद्यार्थी ,80 देश आणि पाच महिने यातून मानसी जाधव आणि नेईल गांधी या सहभागी यांची निवड आफ्रिकेतील साऊथ सुदान आणि आफ्रिकेतील रावडा या 20व्या ऑनलाइन कॉन्फरन्स साठी झालेली आहे .सहभागी झालेले स्पर्धकच्या वतीने आरोग्य, भूक ,महिलांची उन्नती आणि विकास ,हवामानातील बदल आणि बदलणारी शहरे याविषयावर खोल अभ्यास करत आहेत .
यादोघंसोबतच महाविद्यालयाची कला शाखेतील बारावीत शिकणारी श्रेया देशपांडे ही विद्यार्थिनी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन च्या ई-मेल कॉन्फरन्सच्या 21 व्या एडिशन साठी नुकतीच 12 व 13 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या कॉन्फरन्स साठी निवडण्यात आली होती .
या सर्व तीन विद्यार्थ्यांची निवड खऱ्या अर्थाने विद्यालय व महाविद्यालयाच्या वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणारी आहे असे उद्गार रमेश शानभाग यांनी यावेळी काढले .
संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संचालिका सौ .आचल घोरपडे ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी यांनी अभिनंदन केले .