बारामती: कोरोना व लॉक डाऊन च्या काळात सामाजिक भान व जाण जपत बारामती तालुका माजी सैनिक संघटना पोलिसां बरोबर शहर व तालुक्यात काम करण्यासाठी मैदानात उतरली आहे.
कोरोनचा वाढता कहर व 7 सप्टेंबर पासून बारामती मध्ये लॉकडाऊन मुळे शहर व तालुका पोलीस यांच्या समवेत गस्त घालणे,नेमून दिलेल्या ठिकाणी वाहन तपासणी साठी सहकार्य,नागरिकां मध्ये कोरोना होऊ नये म्हणून जनजागृती व पोलीस आदेशानुसार कामे करणार आहे.
सात सप्टेंबर पासून लॉक डाऊन चे आदेश मिळताच जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत नींबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक निस्वार्थी पणे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कामकाज सुरू केले आहे ,बारामती शहर मध्ये माजी सैनिक यांचे कमांड निवृत्त सुभेदार विलास कांबळे करीत असून त्यांच्या जोडीला विविध पॉइंट ठिकाणी पोलिसां समवेत माजी सैनिक कार्यरत आहेत.
“या पूर्वी सुद्धा बारामती मध्ये माजी सैनिक यांनी पोलिसा समवेत काम केले असून विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा दिली आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर सेवा देऊन आम्ही माजी सैनिक कृतार्थ होत आहोत” असे मत संघटनेचे अध्यक्ष हनुमंत नींबाळकर यांनी सांगितले.