फलटण :- आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशन ( इब्टा ) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक १२ सप्टेंबर २०२०
रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा व प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना मेल द्वारे सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळेचे होणारे २०१९ -२०२० चे ऑडिट पुढे ढकलणेबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात, संकपाळ कुलकर्णी असोसिएट्स चार्टर्ड अकाऊंट कोल्हापूर यांचे ऑडिट संदर्भातचे दिनांक ९ सप्टेंबर २०२० च्या पत्राच्या विषयान्वये सन २०१९-२०२० चे सर्व शिक्षा अभियानांतर्गत जे अनुदान आलेले आहे . सदर अनुदानाचा विनियोग योग्य झाला का नाही हे पाहण्यासाठी वरील संदर्भीय पत्रानुसार सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांना ऑडिट संदर्भात तारखा देऊन कळविण्यात आले आहे . परंतु सध्या सर्व शाळा बंद आहेत सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे सदर होणारे ऑडिट सर्वांच्या आरोग्याचा विचार करता पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशन ( इब्टा ) जिल्हा – सातारा यांच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा व प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना मेल द्वारे करण्यात आले आहे.