मालवाहतूक करणारा ट्रक
आसू (राहूल पवार )- फलटण तालुक्यातील पूर्व भागामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्यांना महापूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असता झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले तसेच ओढ्याच्या पाणी साठ्यात वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती.
फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी,साठेफाटा,चव्हाणपाटी , गोखळीपाटी, शिंदेनगर या सर्व ठिकाणच्या ओढ्यांना महापूर आला असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन शेतीचे मोठे नुकसान तसेच काही नागरिकांच्या घरांमध्ये दुकाना मध्ये पाणी जाऊन जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून ओढ्यांना महापूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे व या ठिकाणावरून जाणारी वाहतूक यंत्रणा ठप्प झाली आहे.
गोखळी ता.फलटण येथील ओढ्यात भारत गॅस सिलेंडर मालवाहतूक करणारा ट्रक वाहून गेल्याची घटना.
फलटण वरून आसू याठिकाणी भारत गॅस सिलेंडर घेऊन येणारा मालवाहतूक ट्रक MH11AL632 गोखळीपाटी या ठिकाणच्या ओढ्या मधून पुढे येत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने मालवाहतूक ट्रक वाहून जाऊन एका खड्ड्यात अडकला अडकला.