बारामती: कोरोनाच्या काळात जिथे इतर सामान्य शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या जात आहेत, तिथे मंगळवार दि 8 सप्टेंबर रोजी रात्री बारामतीच्या धाडसी देवदूतांनी भलीमोठी रिस्क घेतल. बारामतीत पहिल्यांदाच कोरोनाग्रस्त गर्भवतीची सुखरूप प्रसूती करण्यात आली..अर्थात जीवनमरणाच्या या लढाईत बाळ किंवा दोघेही दगावण्याची शक्यता लक्षात घेत या देवदूतांनी पुण्याचा तिढा बारामतीतच सोडवला आणि बाळाच्या भोवतीच्या नाळेचाही
बारामतीत काही दिवसांपूर्वी गर्भवती महिलेचे प्राण डॉक्टरांनी वाचवले, तर मरणाच्या दाढेतून कोरोनाग्रस्तास बाहेर काढण्याचीही किमया केली…मंगळवारच्या रात्री अमंगळाशी लढण्याचे धैर्य मनात ठेवून बारामतीच्या डॉक्टरांनी एक नवा पायंडा ठेवला व येथील संवेदनशील मनाची माणूसकी नेहमीच संकटांना भिडते व ऋणानुबंधाचा नवा,नवा धागा जोडते याची प्रचिती दिली.
राज्यात शासकीय स्तरावरील दवाखान्यांमधील प्रसूतीचे आकड्यांचा उच्चांक गाठणारे महिला शासकीय रुग्णालय आज एका वेगळ्याच विक्रमाने लोकांच्या नजरेत भरणार आहे. या रुग्णालयाने फक्त एका रुपयाच्या सरकारी शुल्कात हजारो महिलांच्या प्रसूती अगदी सुखरूप केल्या. मंगळवारी मात्र या दवाखान्यात माणूसकीचा साक्षात्कार फलटणकरांना झाला.
मंगळवारी वेळ रात्री नऊची…फलटण तालुक्यातील एक गर्भवती महिला, गर्भधारणेचे सर्व दिवस पूर्ण भरलेले. गर्भाशयाचे मुख सात सेंटीमीटरपर्यंत उघडलेले अशा स्थितीत महिला शासकीय रुग्णालयात आली. ती आली, तेव्हा तिला लागलीच दाखल करून पुढील सोपस्कार पार पाडायचे होते,मात्र नियतीच्या मनात थोडे वेगळेच असावे..तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला ससूनला जाण्याचा सल्ला दिला गेला होता. तिची परिस्थिती पाहून महिला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापू भोईही चक्रावले. त्यांनी लागलीच बारामतीतील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ आशिष जळक यांच्याशी संपर्क साधला.
सिझेरीयन शस्त्रक्रिया करावी लागल्यास आपला होकार आहे काय? अशी विचारणा केली आणि जोडून लागलीच पेशंट कोरोना पॉझिटिव्ह असल्याची कल्पना दिली. गरीबी आणि अल्प उत्पन्न असलेल्या रुग्णांच्या दररोजच्या अडचणी पाहून त्यावर लागलीच उपाय शोधणारे डॉ. आशिष जळक यांनी एका क्षणात होकार दिला आणि लागलीच स्वतःच्या दवाखान्याच्या पायऱ्या उतरून गाडी महिला शासकीय दवाखान्याच्या दिशेने वळवली देखील..
तोपर्यंत बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्या कानावर ही बाब घालण्यात आली. तेही तात्काळ रग्णालयात पोचले. तेथे पोचल्यानंतर महिला कोरोनाबाधित असल्याने काय करायचे हा प्रश्न पुढे घेऊन चौघांची बैठक झाली.
महिलेस पुण्यास पाठवायचे ठरले, तर बाळाभोवती नाळेचा तिढा आहे, बाळाने शी केल्याने बाळ गुदमरायला लागले आहे अशी सारी माहिती पुढे आली आणि इथेच प्रक्रिया करायचा निर्णय या तिघांनी घेतला. जोडीला डॉ. सचिन तोरवे, भूलतज्ज्ञ डॉ. सुमित जाधवर, महिला परिचारिका अमरजा मार्डीकर, सोनाली, शस्त्रक्रिया कक्षातील तांत्रिक गणेश लोखंडे हे तयारीत होते.
*खास ऑपरेशन थिएटर तयार केले*
याच रुग्णालयात स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष तात्पुरता करण्यात आला आणि तिथे या गर्भवती महिलेची तपासणी झाली. थोडा खोकला व सर्दी होती. सर्वजण पीपीई किट घालून शस्त्रक्रियेसाठी सज्ज झाले आणि गेल्या आठ महिन्यामधील पहिलीच कोरोनाबाधित रुग्णाच्या प्रसूतीची शस्त्रक्रिया काही वेळातच यशस्वी झाली.
तीन किलो वजनाचे सदृढ बाळ जन्माला आले. त्या बाळाच्या कुटुंबियांनाही मोठा आनंद झाला. या महिलेच्या नातेवाईकांना भरून आले. कोणत्याही सरकारी दवाखान्यात असा सुखद अनुभव आम्हाला आजवर आला नाही, मात्र या दवाखान्याने आमच्या मनातील साऱ्या कल्पनाच बदलून टाकल्या अशी प्रतिक्रिया या महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त करीत डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
जेव्हा निरोप मिळाला, तेव्हा मनात कोणतीही किंतू शंका आली नाही, आपल्या वैद्यकीय क्षेत्रात अशी संकटे नेहमीच येतील, समोरचा रुग्ण हा आपल्याकडे आशेने येतो, तेव्हा ही संकटे एकदम सूक्ष्म बनतात. रात्री आमच्यापुढे फथ महिलेस पुण्यास पाठवायचे ठरले, तर बाळाभोवती नाळेचा तिढा आहे, बाळाने शी केल्याने बाळ गुदमरायला लागले आहे अशी सारी माहिती पुढे आली आणि इथेच प्रक्रिया करायचा निर्णय या तिघांनी घेतला. जोडीला डॉ. सचिन तोरवे, भूलतज्ज्ञ डॉ. जाधवर , महिला परिचारिका अमरजा मार्डीकर, सोनाली, शस्त्रक्रिया कक्षातील तांत्रिक गण दिले. या एका चांगल्या गोष्टीचा साक्षीदार बनता आले याचे समाधान असल्याचे डॉ. आशिष जळक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बारामती. यांनी सांगितले.