फलटण : ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना निमित्त शिक्षकां प्रति आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो यंदा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सासवड शाखेतर्फे महात्मा फुले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड येथे बँकेच्या सर्व सेवकांनी हायस्कूलमधील सर्व उपस्थित शिक्षकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टंसिंगचा वापर करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सासवड शाखाप्रमुख गणेश पाटणे यांनी बॅकेच्या विविध कर्ज योजना व बँकेने नुकतेच चालू केलेल्या *UPI PAYTM* ग्राहक सेवेची माहिती दिली .
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे घोषित केलेल्या *सॅलरी पॅकेज* योजनेचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .
अत्यंत माफक व्याजदरामध्ये रु . २५ लाखापर्यंत मध्यम मुदत पगार तारण कर्ज योजना व सेविंग ओव्हरड्राफ्ट कर्ज योजना शिक्षकांसाठी किफायतशीर आहे व या कर्ज योजनेमध्ये कोणतीही प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही तसेच शिक्षकांसाठी रु ३० लाखापर्यंत अपघात विम्याचे संरक्षणनही मिळणार आहे तसेच नवीन वाहन कर्ज योजनेमध्ये सद्यस्थितीमध्ये कमी झालेल्या व्याजदराचा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगितले .
या कार्यक्रमाचे नियोजन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे साहेब यांच्या सूचनेनुसार व फलटण विभागीय कार्यालयाचे विभागीय विकास अधिकारी अविनाश खलाटे साहेब व बी एस बरकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला .
या कार्यक्रमाच्या वेळी महात्मा फुले हायस्कूलच्या प्राचार्या काकडे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सासवड शाखेतील सोनाली पाटणे, विकास अभंग, निलेश साळुंखे व विशाल धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले प्राचार्या काकडे मॅडम यांनी आभार मानले .