कापूरहोळ (प्रतिनिधी): बिडीला संभाजी महाराजांचं नाव देणं आणि त्याची विक्री करणं हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याने संभाजी बिडीचे नाव आता त्वरित बदलण्यात यावं, शिवप्रेमी संघटना व तमाम शंभुभक्त यांच्यामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.बिडीवरील नाव हटवा अशी मागणी “शिवधर्म फाउंडेशन”, महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे. त्यासाठी किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी नारायण पेठ येथे सोशल डिस्टन्स ठेवत अन्नत्याग आंदोलन तथा आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस(दि6 सप्टेंबर) असून यातील एका शिवप्रेमीची सुनील पालवे यांची प्रकृती खालावली असून त्यांना जेजुरी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात गेली ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना या शिव जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं असून या बिडीवर महाराजांचे नाव असून त्याची विक्री केली जात आहे. तो कागद फाडून फेकला जातो.
त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे, हा अवमान सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून आता करण्यात येत आहे.
जर या संबंधीत कंपनीने नाव जर बदलले नाही तर येत्या काही दिवसांत महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिडीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला देण्यात आला आहे.
शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे ,रवींद्र पडवळ, बेधडक न्यूजचे संपादक मच्छिंद्र टिंगरे ,संभाजी ब्रिगेड पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष सागर दादा पोमण, सुनील पालवे, दिनेश ढगे, राज तपसे आधी उपोषणास बसले आहेत.
या उपोषणासाठी निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी प्रत्यक्ष भेट देत आपला जाहीर पाठिंबा दिला.
शिवशंभु स्वराज्य संघटना पुणे, हिंदू साम्राज्य संघटना, संभाजी ब्रिगेड, राजे प्रतिष्ठान ,भोर, वेल्हा, मुळशी शैक्षणिक, सामाजिक ,कला विकास प्रतिष्ठान ,होय हिंदू प्रतिष्ठान, भोर तालुका कामगार सेना, भोर तालुका युवा सेना यांनी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. तसेच सोशल मीडियावर हजारो जणांचा पाठिंबा या उपोषणास मिळत आहे.