सातारा दि.7 (जिमाका): जनावरांसाठी लाळ खुरकुत रोगप्रतिबंध लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पुणे विभागाचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. संतोष पंचपोर यांच्या हस्ते मौजे वेळे येथील गायींना प्रतयक्ष इअर टॅगींग व लसीककरण करुन करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. शशिकांत शिंदे, पोपटलाल ओस्वाल आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत लाभ खुरकुत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पशुपालकांनी सर्व पशुधनास (गायवर्ग व म्हैसवर्ग) नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून टॅगींगसह लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. परिहार यांनी केले आहे.
0000