सातारा दि.7 (जिमाका): पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषदेमार्फत शुपालकांसाठी वैयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविल्या जातात. लाभार्थी निवडीचे निकष तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखानयांत अथवा पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभागामार्फत दिली जाईल.
लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.