कटफळ चौक येथे आशा प्रकारच्या गाड्या साठी
‘ पार्किंग हब ‘ चालू आहे पे अँड पार्क तत्वावर हे चालू आहे परंतु पैसे न भरता पार्किंग करणे ही सवय झाल्याने व पैस्याची बचत करत 4 किंवा 5 दिवस रस्त्याच्या कडेला गाड्या पार्किंग करण्यास कोणीही मज्जाव करीत नसल्याने पार्किंग हब मध्ये असे वाहन चालक पार्किंग करत नसल्याचे निदर्शनास येत आहे
एमआयडीसी मध्ये अनधिकृत मालवाहू गाड्या पार्किंग मुळे अपघातास निमंत्रण पार्किंग हब वर पार्किंग करण्याची गरज
बारामती: बारामती एमआयडीसी मध्ये विविध कंपन्यांच्या मालवाहतूक करणारे ट्रक,कॅन्टेंनर आदी रस्त्याच्या कडेला किंवा विविध कंपन्यांच्या समोरील बाजूस पार्किंग केले जातात त्यामुळे वाहतुकीस अडचण होऊन छोटे मोठे अपघात घडले आहेत आशा अनधिकृत पार्कींगकर कारवाई करावी अशी मागणी नागरिक,उद्योजक व दुचाकीस्वार करीत आहेत.
मोठमोठ्या नामांकित कंपनी मध्ये विविध मटेरियल घेऊन येणारे
ट्रक,कॅन्टेंनर आदी नेहमी एमआयडीसी मधील विविध रस्त्याच्या कडेला,कंपन्या समोर किंवा आर टी ओ कार्यालय च्या पाठी मागील बाजूस उभे असतात त्याचा आकार मोठा असल्याने या पूर्वी दुसऱ्या वाहन चालकास न दिसल्याने अपघात झाले आहेत त्याच प्रमाणे ज्या कंपनीच्या समोर उभे केले आहेत त्यांनाही त्याची वाहने पार्किंग करताना अडचण त्यामुळे एमआयडीसी परिसरातील नागरिक,उद्योजक,दुचाकी व चारचाकी स्वार याना अडचण होत असते आशा अनधिकृत पार्किंग केलेल्या गाड्यावर उपप्रदेशीक परिवहन कार्यालय किंवा एमआयडीसी मधील अधिकाऱ्यांनी किंवा वाहतूक पोलीस यांनी रीतसर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
अनेक वेळा गाड्या मालकास पार्किंग करू नये या बाबत अनेक उद्योजकांनी सांगून सुद्धा मुदाम दुर्लक्ष केले जाते.आशा अनधिकृत पार्किंग मुळे पुन्हा अपघात झाल्यास यास जवाबदार कोण ?
असा प्रश्न आता पुढे येत आहे .
तरी मालवाहतूक गाड्या अनधिकृत पणे पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी मागणी एमआयडीसी मधील नागरिक,उद्योजक करीत आहेत.