बारामती: बारामती शहरातील भिगवण रोड येथील विविध कॉम्प्लेक्स मधील दुकाना मध्ये (रविवार 6 सप्टेंबर ) पावसाचे पाणी जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला या पाऊसाचे पाणी रस्त्यावरून ड्रेनेज लाइन मध्ये जाऊ शकले नाही त्यामुळे तुंबलेले पाणी शेजारील दुकानात शिरले सदर दुकाने ही झेरॉक्स,एलआयसी एजंट कार्यालय,हॉटेल,दवाखाना,फोटोग्राफी, खेळणी आदी आहेत दुकानात पाणी गेल्याने व रात्री ची वेळ असल्याने रात्रभर पाणी दुकानात साचून राहिले व पाण्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे अनेक छोटे व्यवसाईक यांनी संताप व्यक्त केला. .वेंकेटश्वरा कॉम्प्लेस मधील गाळे धारकांनी वारंवार नगरपरिषद प्रशासनास अर्ज,विनंती करून नेहमी पावसाळ्यात पाणी साचत असते आशा पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करा हे वारंवार सांगून सुद्धा दुर्लक्ष केल्याने आज ही वेळ आली व लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती सर्व गाळे धारक यांनी दिली आहे.
दरम्यान नगरपरिषद आरोग्य व पाणी पुरवठा विभागास गाळे मधील पाणी काढण्या साठी विचारणा केली असता लॉक डाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संख्या मर्यादित आहे सद्या पाणी काढणे व मुख्य ड्रेनेज लाइन ला जोडणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.
तर दरवर्षी नगरपरिषद प्रशासनास अडचण सांगितली आहे कोरोना एप्रिल 2020 पासून आहे या पूर्वी च हे काम केले असते तर आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले नसते सदर पाणी व चिखल मुळे आता साप,विंचू आदी ची भीती व डेंगू,फ्लू आदी विविध आजार डासांच्या पादुर्भाव मुळे होण्याची शक्यता असल्याचे गाळेधारक यांनी सांगितले.