फलटण :फलटण तालुक्यामध्ये कम्युनिस्ट विचार रुजवणारे गिरवी गावचे सुपुत्र कॉम्रेड श्री बाबुराव सीताराम कदम (काका) यांचे आज वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाने निधन झाले. अत्यन्त सच्चे, तत्वनिष्ठ, विनम्र, कम्युनिस्ट विचारांशी कायम बांधील अशी त्यांची शेवट पर्यंत वागणूक राहिली.
त्यांनी फलटण तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.
त्यांनी आयुष्य भर अनेक लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता व अनेक वेळा तुरुंगवास भोगला होता.
क्रांतिसिंह नानासाहेब पाटील व आदरणीय नागनाथ आण्णा नायकवडी यांचेबरोबर संयुक्त महाराष्ट्र लढा व गोवा मुक्ती संग्रामामध्ये ते सक्रिय सहभागी होते.
क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांचे फलटण मधील सभेचे नियोजन काकांच्या कडे असावयाचे व सभा झाल्यावर क्रांतिसिंह नानासाहेब काकांच्या गिरवीच्या घरी मुककमी असावयाचे. शाहीर अमर शेख यांचा ही मुक्काम काकांचे घरी होऊन गेला आहे.
कापूस दर आंदोलन, ऊस दर आंदोलन, दुष्काळ मदत आंदोलन तसेच मोरारजीभाई देसाई फलटण मध्ये आले असता त्यांचे विरोधी आंदोलन काकांनी घडवून आणली होती, मोरारजी भाई यांच्या विरोधी आंदोलनावेळी त्यांचे नाकावर पोलिसांच्या काटीचा मार लागून बरीच मोठी जखम झाली होती.
त्यांनी व त्यांचे मित्र कै. पै बाजीराव जगताप, कै. श्री. पृथ्वीराज नाईक निंबाळकर व इतर सहकार्यानी खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणेसाठी तीव्र लढा उभारला होता.
त्यामध्ये त्यांना सहा महिने तुरुंगवास ही भोगावा लागला होता.त्यांनी सहा महिने तुरुंगवास भोगला.कॉम्रेड नागनाथ आण्णा नायकवडी यांचे बरोबर काकांचे घनिष्ठ सम्बध होते, नागनाथ आण्णा बरेच वेळा काकांचे गिरवी गावी मुककमी राहून गेले होते.भूतपूर्व फलटण संस्थानचे अधिपती स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे काँग्रेस मधून भारतीय कम्युनिस्ट पक्षांमध्ये आल्यानन्तर काकांनी श्रीमंत मालोजीराजे यांचे बरोबर सलग दहा वर्षे काम केले होते