फलटण : शिक्षक अन् समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू. समाजाशी एकरूप झालेला शिक्षक हा शिक्षणासाठी गती देतो. शिक्षण अन् समाजाचा संवाद म्हणजेच प्रगतीची वाट. फलटण तालुक्यातील कारंडेवस्ती (मलवडी) शाळेतील
शिक्षक गणेश भगवान तांबे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर झालेला आहे. या त्यांच्या यशाबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, दत्ताबापू अनपट,सचिन रणवरे,गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख गजानन शिंदे
मुख्याध्यापक मोहन बोबडे, कारंडेवस्तीचे ग्रामस्थ,सर्व शिक्षक संघटना,मित्र परिवार या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वाठार निंबाळकर गावचे श्री. गणेश तांबे म्हणजे शिक्षण अन् समाज या दोन्ही क्षेत्रातील आगळा समन्वय. २००५
मध्ये त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात *ठाणे जिल्ह्यातून केली. आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डहाणू तालुक्यातील नंदारे डोंगरी ही त्यांची पहिली शाळा*. कितीतरी अडचणी, अडथळे असूनही खूप कमी कालावधीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा तिथे उमटविला. सातारा जिल्ह्यात बदलीने आल्यानंतर शेरेचीवाडी (ढवळ) येथे काही वर्षे त्यांनी सेवा बजाविली. त्यांची बदली सध्या कार्यरत असलेल्या कारंडेवस्ती (मलवडी) येथे झाली. मुळात ही नव्याने सुरू झालेली शाळा. समोर केवळ प्रश्न अन् प्रश्नच. शालेय इमारतीचा प्रश्न हे तर मोठे आव्हान. *अशा स्थितीतच ग्रामस्थांकडून अर्धा एकर क्षेत्र मिळवून त्यांनी सुसज्ज इमारत उभी केली*. इतकेच नव्हे,
तर शाळेला आयएसओ दर्जा मिळविला. *शाळा स्थानेनंतर कमी कालावधीत हा बहुमान संपादन करणारी ही राज्यातील पहिली शाळा*. परिसरातील वृक्षारोपणामुळे ती अाणखी उठावदार बनली. शैक्षणिक उठावातून शाळेसाठी तीन लाखांचे फर्निचर मिळाले आहे.
गणेश तांबे यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सलग तीन वर्षे प्रथग क्रमांक पटकाविला आहे. तसेच
*राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातही त्यांची निवड झाली* आहे*. लोकचेतना अभियान कार्यक्रमात त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. *स्काऊट गाइड, भाजी मंडई, पालक क्रीडा स्पर्धा, बचत बँक,वाचन-लेखन या त्यांच्या उपक्रमांची वाहवा झाली आहे.
आई हा त्यांच्या श्रद्धेचा विषय. आपल्या अाईच्या स्मृती जोपासताना त्यांनी *वाठार निंबाळकर येथे अाई प्रतिष्ठानची स्थापना केली आहे*.
या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना *आई सन्मान पुरस्काराने गौरविले आहे. गुणवंत विद्यार्थी गौरव, रक्तदान शिबिर, गरजूंना मदत* असे उपक्रम यशस्विपणे राबविले आहेत.
*’पाझर मातृत्वाचा’* हे त्यांनी संपादित केलेले पहिलेच पुस्तक. अनेक विचारवंतांकडून कौतुकाचा विषय ठरले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती अगदी कमी कालावधीत संपली. आई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविधांगी उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविले आहेत.
त्यातून या प्रतिष्ठानचा अगदी अल्पावधीतच सर्वत्र लौकिक पोचला आहे. *राज्यस्तरीय काव्य स्पर्धत त्यांना सुयश मिळाले आहे*.
*लातूर येथील राज्यस्तरीय मानव विकास, औरंगाबाद येथील राज्यस्तरीय जीवनगौरव, फलटण तालुका पंचायत समितीच्या वर्ताने दिला जाणारा आदर्श शिक्षक, महात्मा फुले या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे*.
२००९ मध्ये फलटण तालुक्यात शेरेचीवाडी येथे सेवा सुरू केली. विविध उपक्रमांबरोबर,
इयत्ता सातवीच्या वर्गाचा *शिष्यवृत्ती निकाल १००% व* *एका विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय* *शिष्यवृत्तीधारक म्हणून* निवड* झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ते विविध उपक्रम राबवित असतात. आई प्रतिष्ठानमार्फत शिक्षण क्षेत्रात
ते सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात.
*कोरोनाजन्य काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून केलेलेकार्य, तसेच मदत उल्लेखनीय ठरली आहे*.त्यांनी हा मिळालेला पुरस्कार त्यांच्या स्वर्गीय आईंच्या चरणी अर्पण केला असलेचे सांगितले आहे.अशा आनंदाच्या क्षणी आई हवी होती असेही त्यांनी सांगितले. अशा या उपक्रमशील शिक्षकास भावी वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत.
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा श्रीमान गणेश तांबे सर
Congratulations sir