बारामती : विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री अविनाश संजीवन शिंदे हे नुकतेच आयएएस अधिकारी झाले आहेत. महाविद्यालयात त्यांचा पुरस्कार सोहळा नियमांचे काटेकोर पालन करीत आयोजित करण्यात आला. यात श्री अविनाश शिंदे यांनी आपला जीवनप्रवास मांडला व विद्यार्थी दशेतील आठवणी जागृत केल्या. प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर यांनी पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. विभाग प्रमुख डॉ. परशुराम चित्रगार, प्रा. अविनाश कोळेकर, डॉ. अनिल हिवरेकर व श्री सुदाम कढणे यांनी आपले विचार मांडले. प्रा. अनिल दिसले व प्रा. दीपक सोनवणे आदी मान्यवर उपस्तीत होते.