सातारा दि.2 (जिमाका): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय, सातारा यांच्यामार्फत 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजनेचे 21 व बीज भांडवल योजनेचे 29 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. तरी अनुसूचित जातीतील व्यवसायासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम.एम. माने यांनी केले आहे.