साताऱ्यात उभं राहणार 250 बेडचे कोविड हॉस्पिटल ; आज पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री यांच्याकडून पाहणी

सातारा दि.1 (जिमाका):  सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या कोविड रुग्णायालचे काम तातडीने चालू केले आहे. या कामाची पहाणी सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केली.
या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 7 ते 8 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे, कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी संग्राहलयात 250 बेडचे कोरोना रुग्णालय उभारण्यास मान्यता दिली आहे. या कोरोना रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात 200 ऑक्सीजन बेड व 50 आयसीयुबेड असणार आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणाऱ्या सर्व सुविधा  उपलब्ध करुन द्या, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. तरी मंजूर करण्यात आलेल्या 250 बेडेचे कोरोना रुग्णालयांचे काम तातडीने करुन लवकरात लवकरत पूर्ण करून वापरात येईल त्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी या  पाहणी प्रसंगी केल्या.
कोरोनाची भिती बाळगू नये पालकमंत्री यांनी केले जनतेला आवाहन

गेल्या 7 ते 8 दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढली आहे.  कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. तरी जनतेनही घाबरुन न जाता कोरोनाचा खंबीरपणे मुकाबला केला पाहिजे.
मला 14 ऑगस्ट रोजी त्रास जाणवू लागल्यामुळे माझी कोरोनाची चाचणी केली. माझा अहवाल पॉझिटिव्ह आला,  मला कुठलाही त्रास जाणवत नव्हता. आज मी 14 दिवसानंतर पूर्णपणे बरा झालो आहे. तुमच्या सेवेत रुजू झालो आहे. जनतने कोरोनाला न घाबरता खंबीरपणे मुकाबला करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!